पनवेलच्या रोहिदास वाड्यातील कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेलच्या रोहिदास वाड्यातील कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी



पनवेल(प्रतिनिधी) शहरातील रोहिदास वाडा येथे महापालिकेच्या वतीने समाज मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या समाजमंदिराच्या कामाची महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसह पाहणी केली. या वेळी त्यांनी या कामाचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच या वेळी त्यांनी परिसरातील गटारे आणि रस्त्यांच्या कामाचीही पाहणी केली.

पनवेल महापालिकेमार्फत अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात सुरू आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19मधील रोहिदास वाडा येथे समाजमंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या मंदिराच्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी करून आढावा घेतला, तसेच या वेळी त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील गटारे, अशोका गार्डन परिसरातील गटारांची पाहणी, तथास्तू हॉलजवळील परिसरातील रस्त्याची कामे आणि पंचरत्न सर्कल येथील नाल्याची पाहणी अधिकार्‍यांसोबत केली.
या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, शहर अभियंता संजय कटेकर, आरोग्य निरीक्षक संजय जाधव, भाजप प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, प्रवीण मोहोकर, मधुकर उरणकर, बाबाया जाधव, रजनिस जाधव, सचिन उरणकर, मंगेश पिळविलकर, सुधीर कटेकर आदी उपस्थित होते.

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image