बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

 

बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई


 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील बेलापूर विभाग अंतर्गत करावे, सेक्टर- 36 येथे नवी मुंबई महानगपालिकेची कोणतेही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास बेलापूर विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधीताने केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले आहे.

      सदर अनधिकृत बांधकामावर बेलापूर विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 20 मजुर, १ गॅसकटर, १ इलेक्ट्रीकल हॅमर, 1 मुकादम, 1 पिक अप व्हॅन  तसेच स्थानिक एन.आर.आय. पोलीस व नमुंमपा अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते.

      यापुढे देखीलअशाप्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.