खारघरमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

खारघरमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी




खारघर (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खारघर शहारामध्ये रायगड जिल्हा प्रमुख माननीय श्री. शिरीष दादा घरत यांच्या मार्गदर्शनानुसार  खारघर शहराच्या प्रत्येक सेक्टर  मध्ये  तेथील शाखा प्रमुखांनी  साहेबांची जयंती मोठया उत्साहाने साजरी केली. खारघर शहर प्रमुख श्री. प्रकाशजी गायकवाड यांच्या प्रयत्नाने  खारघर सेक्टर -१,व २, शाखा प्रमुख सचिन ठाकूर व  सेक्टर -८ चे  शाखा प्रमुख  श्री. संजय कानाडे, खारघर सेक्टर -३ शाखा प्रमुख कट्टेमनी  तसेच सेक्टर ११ चे शाखा प्रमुख विशाल कावडे,  सेक्टर -१२ शाखा प्रमुख शिवाजी दादा,  सेक्टर -१५ चे माजी उप शाखा प्रमुख संतोष गायकवाड,  सेक्टर -१६ चे शाखा प्रमुख  पांडुरंग घुले,  सेक्टर -१८ चे शाखा  प्रमुख सतीश पाटील,  सेक्टर -१९ चे शाखा प्रमुख  सचिन पाटील,  सेक्टर - २० चे उप विभाग प्रमुख  अनिल  तळवणेकर,  सेक्टर -२१ चे शाखा प्रमुख प्रशांत जगताप,  तसेच खारघर सेक्टर -३६ मधील सर्व  पधादिकारी यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी संपूर्ण खारघर भगवेमय झाले होते.तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा आपला सभाग मोठ्या प्रमाणात नोंदविला होता.

      वरील सर्व शाखा प्रमुखांच्या वतीने खारघर मध्ये मोठया उत्सहात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरिष घरत यांनी सर्वांना धन्यवाद दीले आहेत तसेच येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असेच सर्वांनी एकदीलाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.




Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image