खारघरमध्ये युवा सेना कोर कमिटीच्या माध्यमातून रोशन पवार यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साड्यांचे वाटप केले

खारघरमध्ये युवा सेना कोर कमिटीच्या माध्यमातून रोशन पवार यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साड्यांचे वाटप केले


खारघर, दि.23 (वार्ताहर)- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्त्य साधून बबनदादा पाटील रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरिषदादा घरत यांच्या आदेशाने तसेच रुपेशदादा पाटील युवा सेना कोर कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर विभाग प्रमुख प्र.क्र६ रोशन सुभाष पवार यांच्या कडून गरीब गरजू माताभगिनींना १०० साड्यांचे वाटप करण्यात आले.रोशन पवार यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कोपरा गांव आणि संपूर्ण खारघरमधून कौतुक होत आहे.

       स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २०%राजकारण ८०% समाजकारण ह्या विचारांना प्रेरीत होऊन आजचा कार्यक्रम राबवीण्यात आला. यावेळी युवासेनेचे संकेत पाटील ,प्रकाश राजपूत ,शक्ती गायकवाड हे उपस्थित होते.

         

Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image