विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मागणीला यश, अमरधाम स्मशानभूमी येथील रस्त्यांच्या मधोमध असणारे विद्युत पोल हटविणार
नवीन पनवेल : मागील सप्टेंबर महिन्यात अमरधाम स्मशानभूमी येथील रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या विद्युत पोलला एक कार धडकली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पालिका अधिकारी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली होती. व रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या धोकादायक विद्युत पोल हटवून भूमिगत करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार अमरधाम स्मशानभूमी येथील रस्त्यांच्या मधोमध असणारे विद्युत पोल हटविणार आहेत.