खारघर शहर शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे जिल्हाप्रमुख शिरिषदादा घरत यांच्या शुभहस्ते प्रकाशन

खारघर शहर शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे जिल्हाप्रमुख शिरिषदादा घरत यांच्या शुभहस्ते प्रकाशन    

       


 

खारघर(प्रतिनिधी)-काल रविवार दिनांक १६ जानेवारी रोजी शीवसेना खारघर शहर शाखेच्या २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिषदादा घरत यांच्या निवासस्थानी समारंभपूर्वक करण्यात आले.यावेळी शिरिषदादा म्हणाले की, आमचे सर्वच शिवसैनिक जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.खारघरमधील गुरूनाथ पाटील आणि प्रकाश गायकवाड यांच्या पुढाकाराने ही दिनदर्शिका छापण्यात आली असून ती संपूर्ण खारघरध्ये वितरीत करण्यात येणार आहे.तसेच त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे आणि सामान्य जनतेच्या अडीअडचणीत त्यांना मदत करण्याचे जे शिवसेनेचे धोरण आहे की, ८०% समाजकारण आणि २०% राजकारण  त्याप्रमाणे वागण्याचे आवाहन केले.                                   

        या कार्यक्रमाला गुरूनाथ पाटील,प्रकाश गायकवाड,अनेक शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी तसेच परिसरातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.