युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांना मेल करताच २४ तासांत कारवाही !

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांना मेल करताच २४ तासांत कारवाही !


शाळेने फी कमी करून तातडीने परीक्षेस बसायला दिली अनुमती !!

नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेत इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेल्या गुंजन ह्या विद्यार्थिनी ला गेल्या ७-८ महिन्या पासून शाळा फी साठी त्रास देत होती !

गुंजन चे वडील नसल्याने घरी हलाकीची परिस्थिती आहे, आई आणि मामा यांज कडून घर चालत असतांना ह्याच शाळेत घरातील २ मुले शिकत आहेत, सुरुवातीची फी दिलेली असतांना बाकी फी मध्ये शाळेने आई एकटी कमावते म्हणून फी मध्ये सवलत देण्याचे वचन दिले होते मात्र तसे न होता सरसकट फी भरण्यास सांगितले आणि फी भरली नाही तर उद्या होणाऱ्या 10 वी च्या टेस्ट परीक्षेत बसता येणार नासल्याचे शाळेच्या प्रिन्सपल यांनी सांगितले ! 

खूप विनवणी केल्या नंतर ही शाळा जुमानत नसल्याने शेवटी पालकांनी युवासेना प्रमुख, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री यांना थेट मेल करून ह्या बाबत तक्रार केली !

तातडीने सदर आदेश रायगड व नवीमुंबई येथील काम पाहणारे युवासेनेचे सह सचिव रुपेश पाटील यांना युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या मार्फत आले असतांना तातडीने पालकांना भेटून सर्व प्रकार सह सचिव रुपेश पाटील यांनी जाणून घेतला व ह्या बाबत थेट रायन ग्रुप च्या हेड श्रीमती आलीस मॅम यांना विचारला आणि हे प्रकरण तातडीने सोडविले नाही तर शाळेत आंदोलन करण्याचे सूतोवाच दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच शाळेने पालकांना बोलावून परीक्षेचा फॉर्म भरून दिला व फी बाबत सवलत युवासेनेची मागणी मान्य केली !

७ महिण्याचा त्रासावर एक तक्रारी नंतर २४ तासांत न्याय मिळाला या बाबत पालकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे व सह सचिव रुपेश पाटील यांचे आभार मानले !! 

कोविड नंतर असे अनेकांना आर्थिक संकट आले आहे अशावेळी शाळा किंवा कॉलेज किंवा इतर ठिकाणी त्रास असेल तर त्यांनी तातडीने रुपेश पाटील यांना संपर्क करावा असे आवाहन यांनी केले आहे ! 

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image