राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला उत्साहात सुरुवात

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला उत्साहात सुरुवात



पनवेल (प्रतिनिधी)-श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवारी (दि. 28) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात सुरुवात झाली. 

नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून महाअंतिम फेरीचे उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने, सहप्रायोजक नील ग्रुपच्या कल्पना कोठारी आदी उपस्थित होते.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे फक्त सांस्कृतिक व्यासपीठ नसून कलाकार निर्माण करणारे व्यासपीठ असल्याचे सांगून नगरसेवक अनिल भगत म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर हे लोकांना एक व्यासपीठ कसे निर्माण करता येईल असा विचार करून कार्यरत असतात. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सर्वव्यापी विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम या व्यासपीठामार्फत केले जाते. आपली सगळ्यांची साथ आम्हाला अशीच राहील आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या मदतीने आम्ही पुढे वाटचाल करीत राहू.

प्रमुख थिएटर्स मुंबईच्या ‘तिडीक’ या एकांकिकेच्या प्रयोगाने स्पर्धेच्या महाअंतिम स्पर्धेला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभरात नऊ एकांकिका सादर करण्याचे नियोजन होते. या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच नाट्यगृहात प्रवेश दिला जात आहे.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image