मुंबई, ठाणे व नवी मुंबई प्रमाणेच पनवेल मनपा हद्दीतील ५०० चौ.फूटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा-शिरिष घरत
मुंबई, नवी मुंबई व ठाणे या शहराप्रमाणेच पनवेल महानगरपालिका ही देखील विकास प्रदेश क्षेत्रात येते. मुंबई, नवी मुंबई व ठाणे मुंबईतील ५०० चौ. फुटाच्या घरांची किंमत आज मितीस बाजार भावाप्रमाणे अधिका अधिक आहे. त्या तुलनेत पनवेल महापालिका क्षेत्रातील घरांच्या किंमती ह्या कमी आहेत. तळोजा एम.आय.डी.सी तसेच सिडकोचे अनेक मोठे प्रकल्प पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक वर्षापासून सुरू आहेत. त्यामुळे सर्व सामन्य चाकरमानी वर्ग मोठया प्रमाणात येथे वास्तव्यास आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जवळपास ४० टक्के घरे ही ५०० चौ. फुट आकाराची आहेत. राज्य सरकारने मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या प्रमाणेच पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५०० फूटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा, या संदर्भात दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.आता काही लोक याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी अशा प्रकारचे निवेदन राज्य सरकारला सर्वप्रथम शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिषदादा घरत यांनीच दीले आहे.
त्या प्रसंगी पनवेल तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगरप्रमुख दिपक घरत उपशहरप्रमुख नविन पनवेल ज्ञानेश्वर भंडारी आदि पदाधिकारी उपस्थित होते.