प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ई-श्रम कार्ड वाटप
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष, गुळसुंदे पंचायत समिती विभाग व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने दापीवली येथे ई-श्रम कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुळसुंदे पंचायत समिती सदस्य मा.श्री.जगदीश पवार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी मा.सरपंच प्रकाश गाताडे, गणेश म्हसकर, मनीषा गाताडे, सदस्य समृद्धी भगत, प्रमोद माळी, रामचंद्र माने, अनंता जाधव, मा.सदस्य प्राजक्ता गाताडे, निलेश तांडेल, भारत पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.