पत्रकार दिनाचे औचित्य साधून साप्ताहिक आर्या प्रहरच्या वतीने पनवेल ,पालघर येथे वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आले
वनौषधी प्रेमींचे आवडते वृत्तपत्र असलेल्या आर्या प्रहारच्या अरुण पाटकर, मौसमी तटकरे,राजेश संखे, सुधीर पाटील, संतोष कोरे ,अमेय पिंपळे, संजोग संखे ,परेश संखे, मुकेश सिंह, सौ.उज्वला जगताप, जितेंद्र सावे आदींच्या हस्ते के.आ.बांठीया विद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी,पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह १०१ नागरिकांना पांढरे चित्रक, कडू चिरायता ,कुडा, गुडमार, वैजयंता तुळस, अडुळसा आदी वनौषधी रोपे भेट दिली.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे.