मराठी पाट्यांच्या राज्यशासनाच्या निर्णयानंतर नवीन पनवेलमध्ये मनसेचे अनिकेत मोहिते आक्रमक
पनवेल /शंकर वायदंडे :-
महाराष्ट्रातील दुकानावर ठळक आणि मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर नवीन पनवेल मध्ये महाराष्ट्र सैनिक आक्रमक दिसले. नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील विभागामध्ये गुरुवारी महाराष्ट्र सैनिकांकडून दुकानदारांना स्मरणपत्रे वाटण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवीन पनवेल शहराध्यक्ष अनिकेत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली लेखी निवेदन देण्यात आले.
प्रत्येक दुकानांवर मराठी पाट्या लावल्याच पाहिजेत. जिथे जिथे दुकानांच्या इंग्रजी पाट्या असतील त्या दुकानदारांना पंधरा दिवसाचा कालावधी देत लवकरात लवकर दुकानाच्या पाट्या या मराठी भाषेमध्ये कराव्यात. नवीन पनवेल खांदा कॉलनी या शहरांमध्ये असाच उपक्रम मनसे राबवणार असं मराठीच्या मुद्यावरून मनसे रस्त्यावर उतरलेली आहे. मराठी पाटी लावण्याच्या निर्णयाला विरोध करून पाहणार्या व्यापारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खळ खट्याक चा इशारा देण्यात आला आहे.
त्याप्रसंगी सुजित सोनवणे, सचिन जाधव, मंदार गोसावी, विशाल दहातोंडे, शार्दूल थोपटे, प्रतिक भालेराव, सौरभ पाटोळे, किरण गावडे, आयुष घार्गे, आदि उपस्थित होते.