चुकीच्या आणि अंदाधुंद पणे जाहीर केलेल्या कोविड रिपोर्टमुळे नागरिकांमध्ये घबराट- विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
पनवेल : सध्या पनवेल शहरात कोरोना पॉझिटिव्ह चे रुग्ण वाढत आहेत ही चिंताजनक बाब आहे, यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या विषयात विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे बोलताना म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे गेल्या महिन्यात केलेल्या रुग्णांच्या टेस्ट आणि या महिन्यात केलेल्या रुग्णांच्या टेस्ट यामध्ये संख्येत वाढ आहे. त्यामुळे जास्त टेस्ट केल्यामुळे रुग्ण साहजिकच जास्त येणार. तसेच एका सोसायटीमध्ये एक व्यक्ती पॉझिटिव आली म्हणून सरसकट सगळ्या घरांमध्ये टेस्ट सध्या केली जात आहे अशा वेळी घरातील सुदृढ व्यक्तीला सुद्धा पॉझिटिव्ह ठरवण्यात येते आणि त्यामुळे घरातील तसेच त्या इमारतीतील सर्व वातावरण घबराटीचे होते. सदर रिपोर्ट करत असताना बिल्डींगमधील व्यक्तीचे नाव, त्याच्या राहत असणाऱ्या मजल्याचा क्रमांक, तसेच त्याचा राहत असलेला इमारतीमधील रूमचा क्रमांक यामध्ये तफावत आढळून आलेली आहे. आणि हा गोंधळ वाला रिपोर्ट जेव्हा नागरिकांना समजतो त्यावेळी नागरिकांमध्ये "पनवेल महानगरपालिके मार्फत फक्त टेस्ट वाढविण्यासाठीच हे सर्व केले जात आहे याची शंका निर्माण होत आहे".
सदरची गोष्ट विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या निदर्शनास आली आणि ही बाब ही खूप चिंताजनक आहे . त्यांनी या गोष्टीत जातीने लक्ष घालून नागरिकांना नाहक त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी आयुक्तांकडे मागणी केली आहे. तसेच टेस्ट करत असलेल्या संस्थेला सुद्धा यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस जाहिर करावी आपल्या माहितीसाठी एक रिपोर्ट पाठवत आहे त्या सोसायटीमधील गृहस्थांना आपण आपली दुसरी टीम पाठवून मी घेतलेल्या शंकेचे निरसन पनवेल महानगरपालिकेने करून घ्यावे आपल्याला पाहिजे असल्यास माझा प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत तेथे जाईल.
तसेच आयुक्तांना दिलेल्या पत्रात विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सांगितले की, पनवे