कळंबोली येथे राजमाता जिजाऊ जयंती ऊत्साहात साजरी

कळंबोली येथे राजमाता जिजाऊ जयंती ऊत्साहात साजरी 


पनवेल प्रतिनिधी: रामदास शेवाळे प्रतिष्ठाण यांच्या मार्फत ता. 12 रोजी बिमा काॅम्पलेक्स कळंबोली या ठिकाणी राजमाता जिजाऊसाहेब यांची 424 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन रामदास शेवाळे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.रामदास शेवाळे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच रामदास शेवाळे यांनी जिजाऊंच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. गेल्या दोन वर्षांपासून मॉं साहेब जिजाऊ जमोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पहायला मिळत आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला.

या वेळी शंकर विरकर, संतोष सपकाळ, अरूण तरंगे, ओमकार शेवाळे तुकाराम सरक, महेश गोडसे, नितिन गुलदगड, संजय शेडगे, नारायण पिलाणे,निलेश दिसले, आनंद माने, निलेश टाकळकर, सुरेश देवाडिगा, प्रविण तावरे, आमृत तरंगे, ज्ञानेश्वर गावडे,दत्ता शिंदे, संदिप शिंदे,श्रीकांत कदम,सुर्यकांत गोडसे, तसेच बिमा व्यापारी संकुला मधील वाहतुकदार व्यापारी व रामदास शेवाळे प्रतिष्ठाण चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रामदास शेवाळे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image