वडिलांच्या आनंदाश्रूंनी गहिवरले पनवेल शहर पोलीस स्टेशन

वडिलांच्या आनंदाश्रूंनी गहिवरले पनवेल शहर पोलीस स्टेशन


नवीन पनवेल : पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशन चा पदभार नुकताच स्वीकारल्या नंतर त्यांचे वडील आपल्या मुलाच्या पदोन्नती नंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी झालेल्या आपल्या मुलाचा कौतूक करण्या साठी आले होते.त्यावेळी वडिलांच्या केलेल्या कौतुकाने शहर पोलीस स्टेशन गहिवरून आले. 

       विजय कादबाने  यांचे वडील त्रिबक कादबाणे हे शिक्षक आहेत अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले वाढळले आहेत. स्वतः प्रमाणे आपल्या ही मुलावर प्रेमळ संस्कार आणी कठोरता या दोन्ही गुणांचा प्रभाव जाणवतो. अत्यंत खडतर परिस्थिती मध्ये आपले शिक्षण पूर्ण करत विजय कादमाणे हे पोलीस दलात 1996 ला रुजू झाले.मुंबई नवी मुंबई सह पनवेल वाहतूक शाखा येते काम पाहिले आहे.या पदोन्नती पूर्वी ते पनवेल शहरला च काम पाहत असल्याने त्याना पनवेल शहराची तंतो तंत माहिती आहे.मुळात आगामी काळात पनवेल महानगरपालिका निवडणूक,विमानतळ नामकरण यावरून होत असलेली आंदोलने,बी जे पी आणी महाविकास आघाडी यांच्यातील तणाव कमी करने आणी पनवेल शहराच्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या भागात नागरी समाधान ही प्रमुख आवाहने आहेत.परंतु मागील त्यांचा कामाचा आलेख पाहता आणी पनवेल शहराच्या संपूर्ण माहिती पाहता ही आव्हाने त्यांच्या साठी नवी नाहीत.जुना अनुभव लोकांशी असणारी जवळीकता ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत जुना अनुभव त्यांच्या पाठीशी आहे .अशा ह्या विकसित होत असणाऱ्या नवीन शहराच्या मुख्य पोलीस स्टेशन ची जबाबदारी आता विजय कादबाने यांच्याकडे आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळल्या नंतर अनेक मान्यवर ,पत्रकार ,व्यवसाईक ,व राजकीय मंडळीनी शहर पोलीस स्टेशनचे कादबाणे साहेब यांना आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यात खास बाब म्हणून आपल्या मुलाला नोकरीत बढती मिळाली म्हणून त्यांचे वडील त्रिबक कादबाणे याना ही आनंद झाल्याने त्यांनी तडक गावाववरून निघत पनवेल शहर पोलीस स्टेशन गाठले .आपल्या  पोलीस अधिकारी झालेल्या मुलाचा हार पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. कष्टाचे चीझ झाले असा आदर भाव वडिलांच्या चेहऱ्यावर जाणवत होते." लोकांची सेवा करा" असा आशीर्वाद देताच उपस्थिती असणाऱ्या पोलीस स्टेशन मधील सहकार्यनसह वातवरण काहीस भारावून गेले.वडिलांनी आपल्या मुलाचा असा आदरयुक्त सत्कार करावा ही वेळ फार कमी मुलांच्या नशिबाला येते.असे आदरयुक्त वडील असतील .तर नवी पिढी या घडलेल्या गोष्टींचा आदर नक्की घेईल.आणी असे अनेक कर्तृत्वान अधिकारी देशसेवेत येतील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक झालेल्या मुलाच्या गळ्यात स्वागताचा हार घालताना हा क्षण पाहणाऱ्याच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या. गहिवरलेले मन ,आणी काही वेळाची शांतता काही वेळानंतर आंनदअश्रूंनी डबडबून गेली होती. आणी ह्या पिता

      पुत्राच्या कौतुक सोहळ्याचा अनेकांच्या सोबतीसह दैनिक पुढारी साक्षिदार ठरला.


################## 


      लोकांच्या साठी यश अपयश हे नेहमी पाठशिवानी चा खेळ खेळत असते.पण यशस्वी होऊन स्वतःच्या वडिलांनी आपल्या मुलाचा हा कौतुक सोहळा करावा या पेक्षा एखाद्या मुलाला काय हवंय.आईच्या अभिननंदनासाठी आलेल्या फोन ने  कादबाने यांच्या भावनांचा उर भरून आला होता."काळजी घे लोकांची सेवा कर" हे आई चे शब्द आपुन अजून ही लहानच आहोत याची प्रचिती करून गेले होते.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image