शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड (पनवेल) मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदार संघ-१८८ मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
आज रविवार दि. २ जानेवारी २०२२ रोजी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते व संपर्क नेते कोंकण विभाग तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री माननीय श्री. सुभाष देसाई साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड (पनवेल) मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदार संघ-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी पदाधिकारी यांना योग्य मार्गदर्शन केले.
या बैठकीस शिवसेना रायगड सल्लागार श्री. रमेश गुडेकर, श्री. शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुका संघटक, तालुका संपर्कप्रमुख, विधानसभा समन्वयक, महानगर प्रमुख, तालुका प्रमुख, ग्रामीण तालुका प्रमुख, महानगर समन्वयक, उपतालुका संघटक, उपतालुका प्रमूख, उपमहानगर प्रमुख, सर्व शहर प्रमुख, शहर संघटक, उपशहर प्रमुख, उपशहर संघटक, विभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी, तसेच युवासेना व युवतीसेना चे सर्व पदाधिकारी तसेच शिवसेना उत्तर भारतीय सेल चे पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने होते.