स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने लोकनेते दि.बा.पाटील यांची जयंती संपन्न

स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने लोकनेते दि.बा.पाटील यांची जयंती संपन्न


पनवेल, दि.14 (संजय कदम)   ः स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने लोकनेते दि.बा.पाटील यांची जयंती संपन्न झाली.

यावेळी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी संचलित स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने पनवेल परिसरातील उरण नाका येथे लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या हस्ते लोकनेते दि.बा.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी या संघटनेला मार्गदर्शन करताना महेश साळुंखे यांनी सांगितले की, लोकनेते दि.बा.पाटील यांनी साडेबारा टक्के विकसित जमीन मिळविण्याकरिता केलेल्या संघर्षामुळे आज ग्रामीण भाग सुखाचे दिवस जगत आहे. त्यांचा प्रत्येक लढा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी होता, याचा विसर कोणालाही पडला नाही पाहिजे. त्यांनी प्रत्येक वेळेला सर्वसामान्य नागरिकांना कसा न्याय देता येईल, याकडेच लक्ष दिल्याने व त्यांच्या विरुद्ध वारंवार केंद्रात व राज्यात सत्तेत असताना आवाज उठविला आहे. त्यामुळेच पनवेलजवळ होवू घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नावच योग्य असून त्याला आमच्या पक्षाचा जाहीर पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रिक्षा संघटनेचे प्रल्हाद ढमाले, अध्यक्ष नरेश परदेशी, उपाध्यक्ष दिलीप नाईक, प्रवीण धुमाळ, मयुर परदेशी, शशिकांत भुई, पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image