रायगड जिल्हा परिषदेत सुभासचंद्र बोस,बाळासाहेब ठाकरे व प्रभाकर पाटील यांना अभिवादन
रायगड जिल्हा परिषद मध्ये आज थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस. हिंदूहृदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व स्व.प्रभाकर पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहायक लेखा अधिकारी श्री.संजीव मोरे यांनी उपस्थितांना या नेत्यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,माजी उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्री.आस्वाद पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश घुले,शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सुहास खोळपे यांनी नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, अधीक्षक सचिन ओव्हाळ, अधीक्षक गणेश गिते, अधीक्षक बाबासाहेब एडके, श्री.प्रशांत काळे, श्री.प्रशांत जुईकर, सुरेश पाटील, रविकिरण गायकवाड तसेच विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.