लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोंगल सण
उलवे (प्रतिनिधी)- उलवे नोड तमिल संगम फाउंडेशनच्यावतीने सेक्टर १९ मध्ये सहाव्या पोंगल उत्सव २०२२ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद खारकर, अमर म्हात्रे, शैलेश भगत, निलेश खारकर, ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, नंदकुमार ठाकूर, महिला मोर्चा उपाध्यक्ष समृद्धी अडसुळे, प्रिया मॅडम, अम्मा इंटरप्रायझेसचे संचालक व्ही. राजा, भाजप साऊथ सेलचे अध्यक्ष मसानम, उपाध्यक्ष कृष्णन, उलवे नोड तमिल संगम फाउंडेशनचे अध्यक्ष पेनिअल. एस, उपाध्यक्ष अल्लाबक्ष, सचिव सुगुमार. एम, खजिनदार सेल्वराज नैनार, समन्वयक मसानम राजराथनम, सहसचिव गणेश. एस, बालन मोहन, सल्लागार संकरा नारायणम, राजेंद्रन. पी, राजेंद्रन जी. एफ., दिनकरण पी, टी. पी. राजू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तमिल संगमच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच पोंगलनिमित्त सणासाठी अन्नधान्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नागरिकांना देण्यात आले.