अजयकुमार लांडगे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक

 अजयकुमार लांडगे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक 


पनवेल : राज भंडारी

नक्षल भागात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे पोलीस अधिकारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आल्यानंतर त्यांनी वाशी, पनवेलसारख्या भागात काम करत असताना गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रपतींमार्फत देण्यात येणारे पदक त्यांना जाहीर करण्यात आले. २६ जानेवारी निमित्त अजयकुमार लांडगे यांना हे पदक बहाल करण्यात येणार आहे.

       यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अजयकुमार लांडगे यांनी सांगितले की, मा. राष्ट्रपती महोदयांनी मला “गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक” प्रदान करून सन्मानित केले आहे, ३२ वर्षांच्या सेवेत माझे गुरू व आई- वडिलांचे आशिर्वाद, मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी, कर्तव्यात साथ देणारे सर्व सहकारी, प्रोत्साहीत करणारे मित्र व आप्तेष्ट, विश्वास व जिव्हाळा असलेले कुटुंबिय, कौटुंबिक जबाबदारी सांभाळणारा भाऊ, आणि सर्व प्रसंगी संयम बाळगून वास्तवाचे भान करून देणारी माझी सौभाग्यवती या सर्वांचे त्यांनी आभार मानले. पनवेल येथून पनवेल शहर पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावरून पदोन्नती होवून ते आज नक्षल विरोधी अभियान, नागपूर येथे उप अधीक्षक पदावर रुजू आहेत. गेल्या ३२ वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.