पनवेल तालुका पत्रकार महासंघ करणार जागतिक किर्तीच्या विजेत्यांचा सन्मान
नवीन पनवेल(प्रतिनिधी): मराठी भाषेतील आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दि. 6 जानेवारी रोजी देशभरात पत्रकार बांधव विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. यावर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे अपंगत्वावर यशस्वीरीत्या मात केलेल्या जागतिक किर्तीच्या विजेत्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी सांगितले.
नवीन पनवेल येथील के.आ. बांठीया विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 11.00 वाजता आयोजी केलेल्या सोहळ्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, जेष्ठ सल्लागार सुनील पोतदार, जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर, के.आ. बांठीया विद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी, माजी अधिक्षक मिलिंद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शो शॉर्टेस्ट बॉडी बिल्डर स्पर्धेत रायगड भूषण, अलिबाग भूषण, भारत श्री यासारख्या विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश मिळवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रतिक विठ्ठल मोहिते यांचा तसेच अलिबाग झिराड श्री, पुणे ज्युनिअर महाराष्ट्र श्री, पनवेल महापौर श्री, भारत श्री, दिव्यांग भूषण, वीर जिजामाता पुरस्कार सन्मानित कनकेश्वर पांडुरंग रसाळ तर स्वमग्नतेवर मात करून 30 पेक्षा अधिक शिष्यवृत्ती संपादन करून 10 इयत्तेत 91% गुण, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परिक्षेत अपंगांमध्ये देशात पहिला, गणित विषयात मास्टर पदवी असे नेत्र यश संपादन करून गणित विषयात पी.एच.डी. करण्याचा मानस असलेल्या जतिन सुरेश पाटील यांचा सन्मान होणार आहे.
तरी या अनोख्या सोहळ्यासाठी पत्रकार बंधू-भगिनींसह समस्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे करण्यात आले आहे.