सुधागड-पाली महसूल प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता समारोह संपन्न


सुधागड-पाली महसूल प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता समारोह संपन्न


अलिबाग, दि.30,(जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, रोहा उपविभागीय अधिकारी कार्यालय, सुधागड-पाली तहसील कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालय, पाली यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय येथे "मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता समारोह आयोजित करण्यात आला होता.    

       याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा नवघर, पाच्छापूर, जिल्हा परिषद शाळा पाली क्रमांक १,२ यासह साई डान्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केले.

       या सांगता समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने, सुधागड पालीचे तहसिलदार श्री.दिलीप रायण्णावर, महसूल नायब तहसिलदार सौ.वैशाली काकडे, गटविकास अधिकारी श्री.विजय यादव, सु.ए.सो.चे सचिव तथा पालीवाला महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री रविकांत घोसाळकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. अंजली पुराणिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सौ. प्रज्ञा मराठे इत्यादींनी मार्गदर्शन केले. 

      यावेळी नायब तहसिलदार श्री.दत्तात्रेय कोष्टी, प्रभारी गट शिक्षणाधिकारी सौ. पवार, उपप्राचार्य प्रा. एम.एस.लिमण, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, तहसील कार्यालय पाली सुधागडचे कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी तथा विविध शाळांतील शिक्षक, पत्रकार, गावातील नागरिक, ग. बा. वडेर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री. पायानी, श्री.वाघुले हे उपस्थित होते. 

      कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. स्नेहल बेलवलकर, प्रा. ज्ञानेश्वर मुंढे, प्रा. अजित खरोसे, प्रा. संतोष भोईर, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image