लाखो रुपये किमतीच्या सेंट्रिंग प्लेटा चोरणाऱ्या दोघा सराईत आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड; जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लाखो रुपये किमतीच्या सेंट्रिंग प्लेटा चोरणाऱ्या दोघा सराईत आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड; जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत


पनवेल, दि.22 (संजय कदम)- लाखो रुपये किमतीच्या सेंट्रिंग प्लेटा चोरणाऱ्या दोघा सराईत आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड असून त्यांच्याकडून सेंट्रिंग प्लेटसह गुन्ह्यात वापरलेल्या दोन रिक्षा असा मिळून जवळपास 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.        पनवेल तालुक्यातील वावंजे येथील गाळा न 01, साई कुटिर बिल्डिंग येथे ठेवलेल्या 2,90,000/- रू किमतीच्या लोखंडी सेंट्रिंग प्लेटा कोणीतरी अज्ञात चोरट्यान्नी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरफोडी चोरी करून नेल्याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वपोनि रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास हा गुन्हे शाखा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संजय गळवे व पोलिस हवालदार महेश धुमाळ, सुनिल कुदळे, पोलिस नाईक पंकज चंदीले, प्रकश मेहेर असे तपास करीत असताना त्यांनी घटनास्थळ जावुन् आजूबाजूचे 21 ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर काही चोरटे हे चोरीचा माल रिक्षाने वाहून नेत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी सदर ऑटॊ रिक्षा पुढे कोठे गेल्या ? हे तपासताना माल सदर 02 ऑटो रिक्षा ह्या फूड कंपनी कळंबोली येथून काही तांत्रिक अडचणींमुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये येत नसल्याने त्याच चौकातील 3 दिशांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु सदर पथकास काही लीड मिळत नसल्याने आरोपींनी 100 मीटर परिसरात चोरीचा माल उतरविला असल्याचा तपास पथकाने अनुमान काढून त्यानंतर एका बातमीदारास विश्वासात घेतले व त्यास सदर दोन्हीही रिक्षाच्या वर्णनात माहिती दिली असता बातमीदाराने प्राप्त माहितीच्या आधारे एका संशयित आरोपीचा मोबाईल क्रमांक तपास पथकाला दिला. त्याचा तांत्रिक तपास करून त्या आरोपीची गुन्हा घडतेवेळी घटनास्थळावरील उपस्थिती निश्चिती केली व त्यानुसार मोनिस अली जाफर सय्यद, वय 28 वर्ष , रा. तळोजा, पनवेल, जिल्हा- रायगड, त्याला प्रथम ताब्यात घेतले व त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुफरान शब्बीर पटेल, वय 23 वर्ष, रा. तळोजा, पनवेल, जिल्हा रायगड व विधी संघर्ष ग्रस्त बालक यांना २४ तासाच्या आत अटक करून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला 100 % माल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे व त्यांच्याकडून दोन्ही रिक्षांसह जवळपास 5,10,000/- रू की चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image