जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी कोविड लसीकरण मोहीम झाली सुरू

                                                                                          जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी कोविड लसीकरण मोहीम झाली सुरू


*लसीकरणासाठी मुला-मुलींनी पुढे येण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन*

 

अलिबाग,दि.3 (जिमाका):-  मुंबई महानगर क्षेत्रात तसेच इतर भागात करोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार, दि.3 जानेवारी रोजी 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरूवात झाली असून यासाठी जिल्ह्यातील 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींनी कोविड लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

       15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ आजपासून डोंगरे हॉल, अलिबाग या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

       यावेळी सुप्रसिद्ध नेपथ्यकार नितीन देसाई यांची तसेच अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मिनल दळवी, अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, नगरसेवक अनिल चोपडा, गौतम पाटील, सामाजिक कार्यकर्ते धर्मेश शहा, मेट्रन जयश्री मोरे, सिस्टर इन्चार्ज उषा वावरे, अंकिता चव्हाण, सुचिता पाटील, अनघा गाडे यांची प्रमुख उपस्थिती हेाती.

     याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष या वयोगटातील मुला-मुलींच्या आजपासून  सुरु झालेल्या या कोविड लसीकरण मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरी जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष या वयोगटातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देवून स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचेही करोनापासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी केले आहे. 

तसेच यावेळी उपस्थित सुप्रसिद्ध नेपथ्यकार नितीन देसाई यांनीही जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष या वयोगटातील मुला-मुलींनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.

      कोविन संकेतस्थळावर दि.1 जानेवारी 2022 पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

    पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय (अलिबाग, चौक, जेएनपीटी/उरण, कर्जत, कशेळे, खोपोली, महाड, म्हसळा, माणगाव, मुरुड, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन) अशी 14 आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका क्षेत्रातील 10 नागरी आरोग्य केंद्रे येथील लसीकरण केंद्रांवर ही लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलामुलींची अंदाजित संख्या 1 लाख 45 हजार 383 इतकी आहे. या सर्वांना को-वॅक्सिन लस देण्यात येणार आहे.

     या लसीकरण केंद्रावर सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी कोविन संकेतस्थळावर दि.1 जानेवारी 2022 पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image