खारघर से-14 येथील दफनभूमीतील लाईट बंद असल्याचे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कार्यकारी अभियंता (विद्युत मेट्रो)सिडको यांच्या निदर्शनास आणून दिले

खारघर से-14 येथील दफनभूमीतील लाईट बंद असल्याचे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कार्यकारी अभियंता (विद्युत मेट्रो)सिडको यांच्या निदर्शनास आणून दिले



खारघर (प्रतिनिधी)- खारघर मधील आपल्या प्रभागातील सेक्टर १४ मधील हिंदूस्मशानभूमीतील लहान मुलांच्या दफनभूमीत हायमास्ट आहे त्या हायमास्ट पोलचे दोन लाईट बंद आहेत. तसेच त्याठिकाणी दोन लाईटचे पोल आहेत ते देखील बंद आहेत त्यामुळे सदर ठिकाणी अंधार असतो दफन करण्यासाठी आलेल्या प्रेतास तेथील कर्मचाऱ्यांना अक्षरशःआपल्या मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात दफनविधी करावा लागतो. परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता त्वरित ते सिडकोच्या कार्यकारी अभियंता (विद्युत )ए. टी. गायधनकार यांच्या निदर्शनास आणून देत ( त्याठिकाणी नादुरुस्त असलेले लाईट व पोल दोन्ही सुरू करण्यात यावेत अशी लेखी मागणी या प्रभागातील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

      सदर ठिकाणी अंधार असल्याकारणाने साप, विंचू इतर प्राण्यांची देखील भीती कर्मचारी व दफन करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना असते.भविष्यात काही अनुचित प्रकार घडण्याआधी आपण त्वरित योग्य त्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image