जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रेरणेतून माणगाव तालुक्यातील एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडीवर कातकरी उत्थान अभियानाचा शुभारंभ


जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रेरणेतून माणगाव तालुक्यातील एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडीवर कातकरी उत्थान अभियानाचा शुभारंभ


अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका):- माणगाव तालुक्यामध्ये महाराजस्व अभियानास प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत दि.16 डिसेंबर रोजी माणगाव तालुक्यातील एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडी येथे कातकरी उत्थान अभियान माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर व तहसिलदार प्रियंका आयरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आले.    

       माणगाव तालुक्यामध्ये एकूण 98 कातकरी वाड्या असून सुमारे 20 हजार इतकी आदिवासी लोकसंख्या आहे. या कातकरी वाड्यांमध्ये शासनाच्या सर्व योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावणे, स्थलांतर रोखणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे, व्यसनाधीनता, बालविवाह रोखणे तसेच रोजगार निर्मिती करुन आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे इत्यादी व्यापक उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान अभियान अधिक गतिमान करण्यासाठी माणगाव तालुक्यातील सर्वच आदिवासी वाड्यांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून  पालक अधिकारी मार्फत वाडीचे संपूर्ण सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक आदिवासी वाडीसाठी एक पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला आला आहे.    

    या अभियानाचा शुभारंभ चांदे एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडीवर झाला असून यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. या शिबिरामध्ये वयाचे दाखले-69, आधारकार्ड नोंदणी-11, वाहन परवाना-9, जॉबकार्ड-13, शिधापत्रिकेमध्ये नाव वाढविणे-26 इत्यादी लाभ देण्यात आले. तसेच यावेळी शासनाच्या विविध योजनांचीही माहिती देण्यात आली व उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथील वैद्यकीय अधिकारी श्री.प्रदीप इंगोले व त्यांच्या पथकामार्फत आदिवासी बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच कोविड-19 चे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले. 

      याप्रसंगी तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुख, सर्व विकासदीप संस्थेचे संचालक श्री. रिची भाऊ व समन्वयक श्री. महेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image