वाहतूक शाखेचे हवालदार महेश पोतदार यांचे होत आहे कौतुक

 वाहतूक शाखेचे हवालदार महेश पोतदार यांचे होत आहे कौतुक


पनवेल, दि.22 (संजय कदम) ः  कर्तव्य बजावित असलेले वाहतूक शाखेचे हवालदार महेश पोतदार यांना मिळालेले रस्त्यात पडलेले पैशाने भरलेले पाकिट व इतर कागदपत्र सदर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     अनिल फडके हे बेलापुर ते नेरे पनवेल बाईकवरून घरी परत येत असताना  कळंबोली सर्केल येथे त्यांचे पॉकेट खिशातून पडले आणि ते पॉकेट वाहतूक पोलीस खात्यात कार्यरत असलेले हवालदार महेश पोतदार यांना सापडले, त्यात साडे आठ हजारांची रोकड, एटीएम कार्ड, आधारकार्ड व इतर कागदपत्रे होती. यावरून त्यांनी त्यात असणार्‍या कागदपत्रांवरून अनिल फडके यांचा शोध लावला व त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे पडलेले पॉकीट मला मिळालेले आहे ते ओळख पटवून घेवून जा, असे सांगितले. ऊ त्याप्रमाणे सोपस्कार पूर्ण करून मुळ मालक अनिल फडके यांना ते पॉकेट प्रामाणिकपणे परत केले. पॉकेट परत मिळाल्याने अनिल फडके यांना आनंद खुप मोठा झाला होता. त्याबद्दल त्यांनी महेश पोतदार यांचे आभार मानले व त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल शाबासकी दिली. आजच्या या धावपळीच्या युगात असे काम करणारी लोकं ही कमीच त्यात अशी माणसे सापडणे म्हणजे दगडात देव शोधण्यासारखे आहे. अशा देव माणसांना मानाचा मुजरा त्यांनी केला आहे.


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image