उड्डाणपुलावर सिमेंटचा बल्कर अडकला
पनवेल, दि.22 (संजय कदम) ः पनवेल शहराजवळून जाणार्या एका उड्डाण पुलावर सिमेंटचा बल्कर अडकल्याने या वाहनाचे नुकसान झाले आहे. तर या अपघातात कोणीही जखमी झाला नाही.
शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पुलावरुन एक सिमेंटचा बल्कर जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटून तो रस्त्याच्या दुभाजकावर जावून अडकला. यात वाहनाचे नुकसान झाले आहे. परंतु कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आाहे.