शिरिष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवसेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नितळस येथील शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

शिरिष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवसेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नितळस येथील शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


(प्रतिनिधी)-  बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननिय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवसेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन व राज्यशीष्टाचार मंत्री सन्माननिय आदित्य ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवसेना सचिव सन्माननिय वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थित व त्यांच्या हस्ते नितळस येथील शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच सुनील काठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, रविंद्र काठे व शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

      त्याप्रसंगी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख, रामदास गोंधळी, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, परशुराम भोपी, एकनाथ काठे, शिवसैनिक सिद्देश गुरव आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image