शिल्पा बारसिंग यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
पनवेल(प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कटगुण (ता. खटाव) येथे रविवारी (दि. 28) झालेल्या कार्यक्रमात शिल्पा देवेंद्र बारसिंग यांना सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय सदाशिव कबुले यांच्या हस्ते तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.