नामदेवशेठ फडके याना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार

नामदेवशेठ फडके याना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार 


पनवेल : क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके याना त्यानी केलेल्या सामाजिक कार्याबद्द्ल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत नरेंद्र भोपी, सुभाष भोपी, डिके भोपी आदि उपस्थित होते.

             पनवेल तालुक्यातील विहीघर गावाचे सुपुत्र आणि क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके हे अनेकाना सढ़ळहस्ते मदत करत असतात. त्यांचे सामाजिक काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अनेक पुरस्कार देऊन घेण्यात आली आहेकोणत्याही राजकीय पक्षाचे वलय नसताना केवळ निस्वार्थपणे नामदेवशेठ फडके अनेकांना मदत करत असतात. पनवेल ते विहीघर हायस्कूल येथे मोफत बससेवा, शाळासाठी मदत, वहया आणि शैक्षणिक मदत, विनामूल्य रुग्णवाहिका, संगणक वाटप, वॉटर फिल्टरचे वाटप, संरक्षक भिंतीसाठी मदत, असे अनेक ठिकाणी नामदेवशेठ फडके यानी मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांना जवळपास 100 हून अधिक सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नुकताच क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके याना राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण संस्था आंतरराष्ट्रीय एनजीओ,दिल्ली यांच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.