मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा


*कोरोना संकटाचे भान राखून सण साजरा करण्याचे आवाहन*


मुंबई, २४:- जगाला शांती आणि प्रेमाची शिकवण देणारे प्रेषित येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळ निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद आणि उत्सवाचे हे पर्व साजरे करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. विषाणूचा नवा प्रकार आणि त्याचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळावी. घरीच थांबून हा सण साजरा करावा तसेच कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

     नाताळच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, येशू ख्रिस्ताने परस्परांचा आदर आणि प्रेमभाव जपण्याची शिकवण दिली आहे. कोरोनाच्या या संकट काळात तर  या शिकवणीचे भान राखावे लागेल. जन्मोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा क्षण जरूर आहे पण तो साजरा करताना आपल्याला परस्परांची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी उत्सव साजरा करण्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. यातूनच आपल्या आप्तस्वकीयांच्या जीवनात आरोग्य आणि पर्यायाने सुख, समृद्धी आणि समाधान येणार आहे. त्यासाठी नाताळच्या या उत्सव पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image