सुकापूरमधील तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश-खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयात बांधले शिवबंधन

सुकापूरमधील तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश-खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयात बांधले शिवबंधन



पनवेल : 

शिवसेना पक्षाची सुरुवातच मुंबईमधून झाली. बाळासाहेबांवर त्यावेळच्या मुंबईकरांनी जितके प्रेम दाखविले तितकेच प्रेम आजही मुंबईकर दाखवित आहेत. सुकापूरसह परिसरात मुंबईहून स्थायिक झालेल्या नागरिकांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर झाली आहे. येथे राहणाऱ्या तरुणांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंब प्रमुख प्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवारी खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचे शिवबंधन मनगटावर बांधले. 

शिवसेना पक्षाचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाशिवाय शिवसेना नाही. ते होते म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगात शिवसेनेचे नाव गाजले. त्यावेळचे शिवसैनिक ज्या पद्धतीने बालासाहेबांसाठी लढले तसे आजचे शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लढताहेत आणि आणखी नवीन चेहरे हे दिवसेंदिवस शिवसेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेत आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून कोरोनाचे परिबंध संपुष्टात आल्यानंतर शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली. दोन वर्षे कोरोना मुळे नागरिकांना कुठेही जाता येत नव्हते, आणि त्यातच महाराष्ट्रातील नागरिकांची ठाकरे सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली काळजी तितकीच प्रभावी ठरली आहे. रविवारी सुकापूरमधील २०० तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये सुकापूर येथील बालाजी सिंफनी मधील निवडक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मध्यवर्ती कार्यालयात जावून शिवसेनेत प्रवेश केला. 

यावेळी सुकापूरमधील नरेश बेटकर, विश्वनाथ बांदल, संतोष कांबळे, विनय निकम, भास्कर वासकर, उमेश सावंत, विक्रम जाधव आदींसह साथीदार तरुणांनी यावेळी पक्षप्रवेश केला. या दरम्यान शिवसेनेचे उप महानगरप्रमुख यतीन देशमुख, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, विभागप्रमुख दत्तात्रेय फडके, युवासेना विभाग अधिकारी मनोज कुंभारकर, शिवसेना उत्तर  भारतीय सेल पनवेल तालुका अध्यक्ष सी.पी.प्रजापती आदींसह पदाधिकारी उपस्थित राहिले होते.