नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा ! सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा चे आवाहन

नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा ! सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा चे आवाहन


अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका)-नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा, असे आवाहन प्रसिध्द क्रिकेटपटू रोहित शर्मा याने केले आहे. 

      रोहित शर्मा हा आज खाजगी कामानिमित्त अलिबाग येथे आला होता. त्यावेळी त्याने रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. 

     यावेळी अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी व सारळ मंडळ अधिकारी श्री. पी.बी मोकल व इतर अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते.

      करोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग त्रासलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये करोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. त्यादृष्टीने सध्या सर्वत्र प्रशासनातर्फे लसीकरणावर जोर दिला जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रशासनाकडून सर्व पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत.   

   जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. यात प्रामुख्याने विविध सुप्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री यांच्या व्हिडीओ चित्रफित माध्यमाचा वापर करून नागरिकांना लसीकरणाबाबतचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत असून लस घेण्याबाबत आवाहनही केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रिकेटपटू रोहित शर्मा याने अलिबाग येथे भेट दिली असता त्याने रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने  नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.    

     नागरिकांनी करोना लसीकरण करून घेण्याबाबतचे आवाहन करणारी रोहित शर्मा याची ही व्हिडीओ चित्रफित मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image