अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त ०८ डिसेंबरला 'कुस्त्यांच्या खुल्या दंगली'

अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त ०८ डिसेंबरला 'कुस्त्यांच्या खुल्या दंगली' 



पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवानिमित्त पनवेल तालुका कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील व बेलवली विभागीय अध्यक्ष सतिश पाटील यांच्या वतीने ०८ डिसेंबर रोजी 'कुस्त्यांच्या खुल्या दंगली' आयोजित करण्यात आल्या आहेत. 
अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस नुकताच विविध समाजोपयोगी उपक्रमात साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या  'कुस्त्यांच्या खुल्या दंगली' चे आयोजन २२ नोव्हेंबरला करण्यात आले होते. मात्र अवकाळी पावसामुळे या दंगली तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता ०८ डिसेंबरला दुपारी १. ३० वाजता बेलवली- वारदोली येथील माऊली मैदानावर या कुस्त्यांच्या दंगली होणार असून या दंगलीचा कुस्ती प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील व बेलवली विभागीय अध्यक्ष सतिश पाटील यांनी केले आहे.