खारघरमधील आरोग्य शिबीर आणि डोळे तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांची शिबिराला भेट
पनवेल : आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष खारघर आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून आवश्यक असलेल्यांना मोफत चष्मा भेट म्हणून देण्यात आला.
निर्माण डायग्नोसिस सेंटर यांच्या माध्यमातून शरीराचे तापमान, ऑक्सीजन लेवल, ब्लड प्रेशर, आवश्यक असल्यास शुगरची मोफत तपासणी करण्यात आली. शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकास जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून निर्माण डायग्नोसिस सेंटर, खारघर येथे होणाऱ्या सर्व रक्त तपासणीमध्ये 50% सवलतीचे कार्ड देण्यात आले अशी माहिती देवेंद्र मढवी, शे.का.प. जिल्हा सहचिटणीस, पनवेल महानगरपालिका क्षेत्र यांनी दिली. या शिबिराला नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ दत्तात्रय पाटील, खारघर शहर अध्यक्ष राम कारावकर, खारघर चिटणीस अशोक मोरे, जिल्हा सहचिटणीस देवा मढवी, पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे, शेकाप नेते जगदीश घरत, रवी पाटील, जयेश कांबळे, दिलीप ठाकूर, बलराम ठाकुर, विलास ठाकूर, ज्ञानेश्वर पवार, हाफिस नावडेकर, शांताराम पाटील, किर्ती मेहरा, कल्पना खरे, संगीता गुलाटी, पिंकी शर्मा, सावंत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.