साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक

 

साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी

पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक


नवी मुंबई दि.17: कोकण विभागात जमीन, हवा, पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या अथवा नवीन उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व संस्था, व्यक्तींनी साहसी पर्यटन उपक्रमाची नोंदणी पर्यटन विभागाच्या *www.maharashtratourism.gov.in* या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन कोकण पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले आहे..

महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रमांना चालना देणे तसेच विविध साहसी उपक्रम आयोजक आणि साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांनी नोंदणी, विनियमन, सनियंत्रण इत्यादी बाबत राज्य शासनाचे साहसी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जमिन, हवा आणि पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या संस्था यांच्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सुचना तयार करण्यात आल्या असून त्यानुसार त्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

पर्यटन संचालनालयाने साहसी पर्यटन उपक्रमांच्या नोंदणी करण्याची कार्यपध्दती सुरू केली असुन *www.maharashtratourism.gov.in* या संकेत स्थळावर Menu- Registration Forms-Adventure Registration यावर Click करुन ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी करता येणार आहे.

      या संदर्भात अधिक माहितीसाठी *पर्यटन संचालनालय उपसंचालक (पर्यटन), प्रादेशिक कार्यालय कोकण भवन, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई किंवा पर्यटन संचालनालयाचे नरीमन भवन, 156/157, 15 वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-21 येथे संपर्क साधावा.* साहसी उपक्रम राबविणाऱ्या संस्था, व्यक्तींनी लवकरात लवकर पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करावी असे आवाहन पर्यटन प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.