गुन्हे शाखा कक्ष 3 ची धडक कारवाई ; 53 लाख 71 हजाराचा एम.डी.अंमली पदार्थ केला हस्तगत

गुन्हे शाखा कक्ष 3 ची धडक कारवाई ; 53 लाख 71 हजाराचा एम.डी.अंमली पदार्थ केला हस्तगत

पनवेल, दि.31 (संजय कदम) ः गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलच्या पथकाने धडक कारवाई करीत तालुक्यातील नेरे वाजे रोडवर एका इसमास ताब्यात घेवून त्याच्याकडून जवळपास मारुती गाडीसह 53 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मेथ्यॉक्युलॉन पावडर (एमडी) हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे.

तालुक्यातील शंकर मंदिर समोरील पिंपळाच्या झाडाजवळ नेरे-वाजे रोडवर एक इसम एमडी हा अंमली पदार्थ घेवून येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 चे वपोनि शत्रुघ्न माळी यांना मिळताच त्यांच्यासह पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर, वपोनि बी.एस.सय्यद, वपोनि पराग सोनावणे, सहा.पो.निरीक्षक तुकाराम कोरडे, सपोनि सागर पवार, पो.उपनिरीक्षक विजय शिंगे, पो.हवा.रवींद्र कोळी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी कलीम रफिक खामकर (39 रा.भुसार मोहल्ला, पनवेल) याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या एका प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये 50 लाखाचा एमडी हा अंमली पदार्थ तसेच सोबत त्याच्याकडे असलेली मारुती गाडी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा मिळून जवळपास 53 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image