साप्ताहिक क्षितिजपर्व दिवाळी अंकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल(प्रतिनिधी) साप्ताहिक क्षितिज पर्व वृत्तपत्राच्या दिवाळी अंक विशेषांकाचे प्रकाशन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते आज (दि. ०१) भाजपा मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, जेष्ठ पत्रकार दिपक महाडिक, कार्याध्यक्ष केवल महाडिक, सचिव विशाल सावंत, सहसचिव रवींद्र गायकवाड, क्षितिज पर्वचे संपादक सनीप कलोते, कमलाकर शेळके, पत्रकार शंकर वायदंडे, दीपाली पारसकर, आशिष साबळे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी क्षितिज पर्वला पुढील वाटचालीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.