अल्पवयीन मुलीस मारहाण करून तीच्यावर जबरी संभोग करणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस मारहाण करून तिला धमकी देवून मोटार सायकलवर जबरदस्तीने बसवून तिला फार्म हाऊसवर नेवून तिच्यावर वेळोवेळी जबरी संभोग करणार्या इसमाविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील मोर्बे परिसरात राहणारी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तळोजा येथे रिक्षाने उतरून एकटी पायी जात असल्याचा फायदा घेवून आरोपीने तिला मारहाण करून धमकी देवून मोटार सायकलवर जबरस्तीने बसवून फार्म हाऊसवर घेवून जावून तिच्या संमतीशिवाय तिच्यावर वेळोवेळी संभोग केल्याची तक्रार सदर मुलीने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.