एनएमएमटीच्या मार्ग क्रमांक 58 वरील बसेसमध्ये वाढ


 

एनएमएमटीच्या मार्ग क्रमांक 58 वरील बसेसमध्ये वाढ



 

            संपूर्ण देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने 25 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात टाळेबंदी (LOCKDOWN) लागू करण्यात आलेली होती. नागरिकांना प्रवासी सेवा देणारा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अत्यावश्यक सेवेत येत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या केंद्र व राज्य शासनाने  दिलेल्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी परिवहन उपक्रमाचे बस संचलन आवश्यक त्या प्रमाणात सुरू ठेवण्यात आले होते.

      सद्यस्थितीत सर्वसामान्य प्रवाशी जनतेसाठी सार्वजनिक बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत शासनाकडून सूचित करण्यात आले असल्याने नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत टप्प्याटप्प्याने कार्यरत बसेसमध्ये वाढ करून संपूर्ण बस मार्गावरील बससंचलन पूर्ववत करण्यात येत आहे.

      एनएमएमटी उपक्रमाचा मार्ग क्र. 58 हा वाशी सेक्टर 7 ते खोपोली असा कार्यान्वित आहे.  सद्यस्थितीत या मार्गावर सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी 2 बसेसव्दारे प्रवाशी सेवा देण्यात येत होती. तथापि कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे लक्षात घेता प्रवाशी जनतेच्या सततच्या मागणीनुसार या मार्गावर अंशत: बदल  करून बसेस वाढविण्यात येत आहेत.

      या बदलामध्ये एनएमएमटी मार्ग क्रमांक 58 हा बस मार्ग वाशी सेक्टर 7 ऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत सिमित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बसेसमध्ये वाढ करून संपूर्ण दिवसाचे 7 -5 – 7 बसेस द्वारे प्रवाशी सेवा देण्यात येत आहे. याशिवाय दोन बस फे-यांमधील कालावधी कमी करून आता 58 क्रमांकाच्या मार्गावर 30 ते 35 मिनिटांच्या प्रस्थांनातराने प्रवाशांना बस सेवा पुरविण्यात येत आहे.

      प्रवाशांना उत्तम आणि त्यांच्या सोयीची प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून या बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.
Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image