द्रोणागिरी, उलवे, खारघर नोड तसेच हेटवणे जलवाहिनी मार्गावरील गावांत 30 नोव्हेंबर 2021 ते 1 डिसेंबर 2021 या कालावधीत पाणी पुरवठा बंद

द्रोणागिरी, उलवे, खारघर नोड तसेच हेटवणे जलवाहिनी मार्गावरील गावांत 30 नोव्हेंबर 2021 ते 1 डिसेंबर 2021 या कालावधीत पाणी पुरवठा बंद


सिडको महामंडळाच्या हेटवणे पाणी पुरवठा योजने अंतर्गत असलेल्या जलवाहिनी मार्गावर महावितरणकडून होणारा विजेचा पुरवठा महावितरणच्या जिते येथील उपकेंद्राच्या दुरुस्तीच्या व देखभालीच्या  कारणास्तव बंद करण्यात येणार असल्याने हेटवणे जलशुध्दीकरण केंद्र हे बंद राहणार आहे. यामुळे  हेटवणे पाणी पुरवठा जलवाहिनी मार्गावरील सर्व गावांत तसेच द्रोणागिरी, उलवे आणि खारघर नोड या भागांत मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.00 पासून ते बुधवार, 1 डिसेंबर 2021 सकाळी 9.00 वाजे पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  

          तरी संबंधित नोड व गावांमधील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा आवश्यक साठा करून, पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.