पनवेल मध्ये शुक्रवारी होणार "मनोरंजन अनलॉक"-भाजपा सांस्कृतिक सेल तर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्जन्य रोगाचा प्रबंध व नियंत्रण उपाय म्हणून पनवेल महानगरपालिका क्षेत्र तसेच संपूर्ण राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून नाट्यगृह संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. परंतु नुकतेच काढलेल्या परिपत्रकामध्ये २२ ऑक्टोबर २०२१ पासून नाट्यगृह सुरु करण्यात यावे असे जाहीर केले आहे.
ह्या पार्शवभूमीवर भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल - उत्तर रायगड जिल्हा तर्फे आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर ह्यांच्या नेतृत्वाखाली "मनोरंजन अनलॉक - २.०" - संगीत, नृत्य व नाटकांची मेजवानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये "नृत्य आराधना कलानिकेतन ग्रुप, आदई" आणि स्टार प्लस वरील डान्स प्लस ५ फेम "पनवेलकर्स ग्रुप" हे नृत्य सादर करणार आहेत. तसेच "सामगंध ग्रुप,पनवेल" हे सुरेल गाण्यांची मैफिल रंगवणार आहेत. त्यानंतर अटल करंडक राज्यस्थरीय एकांकिका स्पर्धेचे विजेते 'कलांश थिएटर, रत्नागिरी तर्फे 'बारस' " हे धमाल विनोदी नाटक सादर होणार आहे.
ह्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून भाजपा सांस्कृतिक सेल चे प्रदेश अध्यक्ष, लातूर मनपा चे गटनेते शैलेश गोजमगुंडे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व भाजप सांस्कृतिक सेल चे इतर काही प्रदेश व विभागीय प्रमुख पदाधिकारी व उत्तर रायगड आणि पनवेल भाजप चे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्तर रायगड चे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन ह्यांनी दिली. सदर कार्यक्रम हा पनवेलच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर )सायं ६.३० वाजता आयोजित केला असून ह्या कार्यक्रमासाठी प्रवेश हा मोफत असून प्रवेशिका सोबत असणं अनिवार्य आहे.