नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची पनवेल महानगरपालिका हद्दीतील खेळाची मैदाने व उद्याने खुली करण्याबाबत आयुक्तांकडे मागणी

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची पनवेल महानगरपालिका हद्दीतील खेळाची मैदाने व उद्याने खुली करण्याबाबत आयुक्तांकडे मागणी


खारघर (प्रतिनिधी)-कोरोना संसर्गजन्य आजराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून विशेषतः सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली होती. परंतु आता शासनाच्या वतीने कोरोना संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी लसीकरण करण्यात आले असून आपल्या पनवेल महानगरपालिका हद्दीत जवळपास ९० टक्के नागरिकांना लसकवच दिले गेल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे म्हणणे आहे. सध्यस्थितीत सर्वच सार्वजनिक ठिकाणे उघडे / खुली करण्यात आली आहेत. सर्व नागरिकांची तसेच ज्येष्ठ नागरिकांसह तरुण वर्गाची मागणी आहे की आपल्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील खेळाची मैदाने, उद्याने ही लवकरात लवकर खुली करण्यात यावी.

      खारघर येथील सर्वात मोठे असे व सर्वांचेच विशेषतः लहान मुलांचे नेहमी आकर्षण असलेले सेंट्रल पार्क देखील खुले करण्यात यावे अशी रहिवाश्यांची मागणी आहे. आपण वरील सर्व बाबीचा विचार करता व लोकांचे आरोग्य लक्षात घेता सर्व खेळाचे मैदाने व उद्याने खुली करावीत अशी लेखी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.