दिशा महिला मंच आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने श्रद्धा अकॅडेमी कामोठे येथे संकल्प नेत्रदानाचा उपक्रम संपन्न

दिशा महिला मंच आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने  श्रद्धा अकॅडेमी कामोठे येथे संकल्प नेत्रदानाचा उपक्रम संपन्न


पनवेल (प्रतिनिधी)- दिशा महिला मंच आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने  दिनांक 24 ऑक्टोबर रविवार रोजी श्रद्धा अकॅडेमी कामोठे येथे संकल्प नेत्रदानाचा उपक्रम आयोजित केला होता. उपक्रमास उपस्थित डॉ. तन्वी खोसला यांनी नेत्रदानाचे महत्व व गरज यावर योग्य मार्गदर्शन केले. तसेच डॉ वैशाली जवादे यांनी नेत्रदान व देहदान कुठे व कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. रंजना सडोलीकर मॅडम यांनी उपक्रमाचे  कौतुक करत जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावे या संदर्भात मार्गदर्शन केले.105 नेतत्रदात्यांनी यावेळी मारणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला त्यासाठी रीतसर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या.

    आजूबाजूच्या परीसराची ओळख करून देणारे,आपल्याला जगाशी जोडणारे ,आत्मविश्वास वाढवणारे आपले डोळे.....डोळे आहे तर जग आहे असे म्हणणारे आपण....स्वतःच्या डोळ्याने पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही असे म्हणणारे आपण...जाताना काहीच घेऊन जाऊ शकत नसलो तरी काहीतरी देऊन जाणार ज्याने  की अपरिचित व्यक्तींचे अंधकारमय  आयुष्य उजळूण निघेल असा मनाचा निर्धार करून नेत्रदानाचा संकल्प केला. खूप दिवसापूर्वी नेत्रदान करावे असा विचार फक्त मनात घोळत राहत होता पण आज दिशा व्यासपीठामार्फत तो संकल्प पूर्ण झाला याचा आनंद नेत्रदात्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि याचे मनोमन समाधान वाटते असे व्यासपीठाच्या संस्थापक, अध्यक्ष निलम आंधळे यांनी सांगितले. उपक्रमास आवर्जून उपस्थित असणारे कामोठे कॉलनी फोरम चे अध्यक्ष मंगेश आढाव यांनी उपक्रमचे कौतुक केले तसेच निरव नंदोला,प्रशांत कुंभार, अमित गुटुकडे, राहुल शिंदे, संगिता राऊत,जयश्री झा उपस्थित होते संस्थापक निलम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ख़ुशी सावर्डेकर व मनिषा कोचळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम कामोठे येथे यशस्वीरीत्या पार पडला.