कोन सावळे रस्त्यासाठी शेकाप चे रस्ता रोको आंदोलन-एक महिन्यात सिमेंट काँक्रीटीकरण प्रक्रियेला होणार सुरुवात
पनवेल (प्रतिनिधी)-पनवेल तालुक्यातील भळभळती जखम असं ज्या रस्त्याचं वर्णन करावं तो रस्ता म्हणजे कोन् ते सावळे रस्ता.अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्याने गेल्या दोन वर्षात १८ नागरिकांचे बळी घेतले आहेत.रसायनी औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो.या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.अनेक निवेदने देऊन देखील कधीचीही किंमत न येणाऱ्या प्रशासनाविरोधात शेतकरी कामगार पक्षाने शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले.
आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाचा इशारा दिल्याने लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात जात नेत्यांना आंदोलन न करण्याची विनवणी केली होती.
पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी देखील आमदार बाळाराम पाटील यांना रस्ता रोको आंदोलन न करण्याची विनंती केली होती.प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत आमदार बाळाराम पाटील यांनी प्रतीकात्मक रास्तारोको आंदोलन केले.परंतु हे जरी प्रतीकात्मक रास्ता रोको आंदोलन असलो तरी येत्या एक महिन्यात सिमेंट काँक्रिटीकरण प्रक्रियेला सुरुवात न झाल्यास शेकाप स्टाईलने रस्ता रोखून धरू असा सज्जड इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. आंदोलनाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर भोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन 30 नोव्हेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून नारपोली पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन दिले.
या आंदोलनात आमदार बाळाराम पाटील यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य राजू गणा पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवा पाटील, कोन ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुशा अशोक म्हात्रे,सदस्य दीपक म्हात्रे,पुरषोत्तम भोईर,नाना मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम भोईर मा.सभापती गजानन माळी, जि. प सदस्य राजू पाटील, पंचायत समिती सदस्य जगदीश पवार
आदी मान्यवरांच्या सहकार्य करतेआदी मान्यवरांच्या सहा कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.