केंद्र सरकारच्या विरोधात पनवेल परिसरात युवा सेनेने काढली सायकल रॅली
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात पनवेल परिसरात युवासेनेने सायकल रॅली काढुन केंद्र सरकारचा निषेध केला.
युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र सरकारच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल परिसरात सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयक नितिन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, सनी टेमघरे, निखिल दिघे, अरविंद कडव शहर अधिकारी निखिल भगत, जितेंद्र सिद्धू, जय कुष्टे, शहर समन्वयक उमेश क्षीरसागर,साईसुरज पवार, उपशहर अधिकारी विराज साळवी, सतीश पाटील, दुर्गेश शुक्ला, शहर चिटणीस सुयश बंडगर, विभाग अधिकारी आभेष ओंबळे, उपविभाग अधिकारी सचिन महामुलकर, शाखा अधिकारी सौरभ म्हामुलकर, आर्यन कदम, अमेय ठाकरे, उपशाखा अधिकारी प्रितम यादव, सिद्धेश गुरव सृजन जोशी व तसेच युवतीसेनेच्या हिमानी गायकर, धनश्री भगत व अनेक युवासैनिक उपस्थित होते.
फोटो ः पनवेल शहर परिसरात काढलेली युवा सेनेने सायकल रॅली