'मायाक्का देवीचा हार जागर' ला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल(प्रतिनिधी) राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था कामोठे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या ' मायाक्का देवीचा हार जागर' ला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी आयोजकांतर्फे त्यांचा धनगर समजाचे प्रतीक घोंगडी, काटी, फेटा व फोटो प्रतिमा देऊन धनगरी पोशाख देऊन सत्कार करण्यात आला