रोटरी क्लब मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम होतेय-आमदार प्रशांत ठाकूर

रोटरी क्लब मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम होतेय-आमदार प्रशांत ठाकूर


पनवेल दि.८ सप्टेंबर 

(प्रतिनिधी) - रोटरी क्बल ऑफ पनेवल सिंम्फनीच्या माध्यमातून पनवेल शहरातील काश्यप हॉलमध्ये ‘वस्त्र विविधा’ या साड्यांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. तीन दिवसीय आयोजीत या प्रदर्शनाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोटरी मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.

पनवेल शहरातील टिळक रोड येथील काश्यप हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सिंम्फनीच्यावतीने ‘वस्त्र विविधा’ हा आकर्षक अश्या साड्यांच्या भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, रुचीता लोंढे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिंम्फनीचे अध्यक्ष गणेश देवळे, सेक्रेटरी योगीता देशमुख, खजीनदार श्रीपाद वैशंपायन, यांच्यासह पदाधिकारी, आणि मान्यवर उपस्थित होते.