स्वर्गीय लक्ष्मणशेठ पाटील व स्वर्गीय अविनाश म्हात्रे- पाटील यांच्या स्मरर्णार्थ ‘नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप’-आमदार प्रशांत ठाकूर, अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती

स्वर्गीय लक्ष्मणशेठ पाटील व स्वर्गीय अविनाश म्हात्रे- पाटील  यांच्या स्मरर्णार्थ ‘नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप’-आमदार प्रशांत ठाकूर, अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती 



पनवेल (प्रतिनिधी) स्वर्गीय लक्ष्मणशेठ पाटील व स्वर्गीय अविनाश म्हात्रे- पाटील  यांच्या स्मरर्णार्थ लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप’ कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थितीत लाभली. या शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
 नावडेे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वर्गीय 
 लक्ष्मणशेठ  पाटील व स्वर्गीय अविनाश म्हात्रे- पाटील  यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ‘नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच याशिबीरामध्ये अल्पदरात मोती बिंदु शास्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सचिन लक्ष्मणशेठ पाटील व नावडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने  आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला नागरीकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, ५५० हून अधिक नागरीकांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच सुमारे ४०० हून जास्त नागरीकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सचिन लक्ष्मणशेठ पाटील, नारायण जोमा म्हात्रे, विष्णु जोमा म्हात्रे, शैलेश लक्ष्मणशेठ म्हात्रे, संतोष विष्णु म्हात्रे, रमेश विष्णु म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, कुनाल अविनाश म्हात्रे, अनंता रामदास म्हात्रे, राजेश खानावाकर, प्रशांत म्हात्रे, पंकज म्हात्रे, धिरज म्हात्रे, अरुण गवळी, निलेश म्हात्रे, राजेश म्हात्रे, भालचंद्र खानावकर, मदन खानावकर, रवींद्र खानावकर, राम खानावकर, लक्ष्मण खानावकर, यशवंत ठाकूर, विनोद खानावकर, विशाल खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
 भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, लक्ष्मणशेठ पाटील यांनी समाजाच्या दृष्टीकोनातून आपल्याला जेजे देता येईल याचा प्रयत्न सातत्याने केला. लक्ष्मणशेठ पाटील व अविनाश यांच्या निधनाने दुःखातून बाहेर येत त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांचे अनुकरण करत समाजासाठी आपण काही केले पाहिजे या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच लक्ष्मणशेठ पाटील यांची समाजासाठी काम करण्याची प्रवृत्ती होती तीच प्रवृत्ती त्यांची पुढील पिढी तितक्याच समर्थपणाने चालवेल असा विश्वास व्यक्त केला.